Wednesday, June 8, 2011

बाबा रामदेव आणि सरकार!




       

                बाबा रामदेवांचे आंदोलन सरकारने मोडून काढले. कारण काय तर रामदेव बाबा मोठे ‘ठग’ आहेत. जर रामदेव बाबा ठग असतील तर त्यांना भिण्याची काय गरज? सरळ त्यांना तुरुंगातच टाका ना! त्यांना भेटण्यासाठी तीन-तीन मंत्री पाठवण्याची काय गरज? आणि रामदेव बाबा ठग का ? तर ते कुणाचे तरी हस्तक आहेत. त्यांनी उचललेले मुद्दे कितीही प्रामाणिक असले तरी ते राजकारण करू पाहत आहेत म्हणून त्यांना उपोषण वगैरे करण्याचा अधिकारच नाही. देशात कितीही भ्रष्टाचार होत असला तरी त्यावर बोलण्याचा विरोधकांना काय अधिकार? तो अधिकार फक्त सरकारलाच आहे. केवळ परदेशात कुणा कुणाची संपत्ती आहे? हेच सांगण्याची सरकारची हिम्मत नसेल तर मग लोक काय फक्त नशिबालाच दोष देत बसणार आहेत? ( सरकार हे कसे विसरले कि हे रामदेव नसते तर दुसरे रामदेव उभे राहिले असते.) आगोदर अमाप संपत्ती जमा करावयाची आणि कुणी म्हणाले यांच्याकडे बेकायदेशीर संपत्ती आहेतर तुझ्याकडे किती आहे त्याची चौकशी करतो म्हणून धमकी द्यावयाची. या धमकीने आपला प्रामाणीकपणा तर सिद्ध होत नाही ना! रामदेव बाबांना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप, असेच तर सरकारला म्हणायचे आहे.
सरकार म्हणते रामलीला मैदानावर उपोषण करण्याची परवानगी रामदेव बाबांना नव्हती. रामदेव बाबांनी भक्तांना फसवले. सरकार खरोखरच प्रामाणिक असते तर त्यांनी आगोदर रामदेव बाबांना रामलीला मैदान खाली करण्याची चेतावणी ( स्पीकर द्वारे) दिली असती. लोकांना रामलीला मैदान खाली करा असे सरकारने का सांगितले नाही? सरकार म्हणते रामदेव बाबांनी लिहून दिले होते कि मी उपोषण बंद करतो. रामदेव बाबांनी जर गुप्तता बाळगली असेल तर सरकारने तर गुप्ततेची शपथच घेतलेली होती! त्यांनी लोकांना का नाही सांगितले कि  आम्ही काळा  पैसा आणण्यास तयार आहोत. तरीही रामदेव उपोषण सोडण्यास तयार नाहीतअंधारात साटेलोटे करावयाचे आणि अंगलट आले कि बोंब मारावयाची. हाच का सरकारचा स्वच्च कारभार?
       म्हणे रामदेव बाबांना धडा शिकविल्या नंतर आता आण्णा हजारेंना हात दाखवायचा आहे. हि काही चांगली लक्षने नाहीत. आण्णांची ताकद, प्रामाणिकपणा यांना काय कळणार? करून करून काय करणार? तर त्यांच्या संस्थांची चौकशी करणार. त्या बरखास्त करणार. आता हा म्हातारा भिण्याची शक्यता खुपच कमी आहे. म्हातारा एकदा जर उपोषणाला बसला आणि तेही निवडणुकांच्या काळात जर बसला तर हे सरकार भस्म करूनच सोडेल. मग बसा बोम्बलत यामध्ये जातीवादी शक्तींचा हात आहे म्हणून. आगोदर आपणच जातीवादाची लागवड करावयाची. झाड मोठे झाले कि दुसऱ्याच्या नावाने बोंब मारावयाची.
       लोकांना कुणी वाली राहिलेला नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची गत झालेली आहे. कुनीही निवडून दिला तरी समस्या त्याच. त्या कधी दूर होणार नाहीत.
प्रा. बिडवे नारायण
परतूर.

द्या आण्णा हजारेंना पाठिंबा!



आज देशात देशभक्तीला भलताच ऊत आलेला आहे. संवादाच्या साधनांना व वृत्त वाहिन्यांना  सोबत घेऊन आम्ही दुसरा स्वातंत्र्य लढा लढत आहोत. स्वातंत्र्य कुणापासून तर आम्हीच निवडून दिलेल्या प्रतीनिधींपासून. त्यांना निवडून देत असताना त्यांनी आमचे हात (नोटांनी) बांधले होते. आणि आमची मते त्यांनीच टाकली. आम्हाला मतदानच नाही करू दिले. काही जणांना त्यांनी ए. सी., कुलर, भुलीचे औषध ( बाबू स ‘मजा’  करो) दिले त्यामुळे आम्हाला झोपा लागल्या व आम्ही मतदानालाच जाऊ नाही शकलो. आम्हा सगळ्या देशभक्तांना त्यांनी असेच फसविले.
जे देश भक्त नव्हते ते मतदानाला गेले व त्यांनी या भ्रष्ट नेत्यांना निवडून दिले. ठीक झालेली चूक आम्ही आता दुरुस्त करू. आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत या सरकारला काम करू देणार नाहीत. आता आजपासून आम्हीच देशाचे पंतप्रधान!
येथून पुढे आम्ही कधीच ब्लैक मध्ये सिनेमाचे, रेल्वेचे  तिकीट घेणार नाहीत. बेकायदेशिररीत्या शाळा, महाविद्यालयाची फीस भरून आपल्या पाल्यांना प्रवेश देणार नाहीत. महापालिकेच्या शाळेत शिकवू परंतु अशा भ्रष्ट शाळेत प्रवेश देणार नाहीत. महानगर पालिकेने पुरविलेले पाणीच पिऊ. बिसलेरीचे पाणी पिणार नाहीत. नळाला खराब पाणी आले तर उपासी राहू किंवा त्याविरुद्द उपोषण करू परंतु शुद्ध, बॉटलचे पाणी पिणार नाहीत. वाहन, जमीन विकत घेतल्यास त्याची नोंदणी करण्यासाठी एजंटांना पैसे देनार नाहीत. घरचा माणूस मेला तरी बेहतर परंतु आम्ही त्याला सरकारी दवाखान्यातच नेऊ. तेथे डॉक्टर नसतील तर डॉक्टरांच्या विरुद्ध तक्रार करू. गैस मिळत नसेल तर जास्तीचे पैसे देणार नाहीत. मुलाला प्रामाणिकपणे जी नोकरी मिळेल तीच करावयास लाऊ. कुणी पैसे मागत असल्यास त्याच्या विरुद्द तक्रार करू व नोकरीवर पाणी सोडून देऊ.
शेजाऱ्यांच्या घरात चोर शिरला तर स्वतः त्याला पकडू.
अशा प्रकारच्या देशभक्तीची आम्ही शपथ घेतो.
प्रा. बिडवे नारायण
परतूर
९९२३९९०९५८

Wednesday, June 1, 2011

आपण साधू आहोत!

      आपले महान नेते, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते सगळेच्या सगळे     साधू आहेत. त्यांना पैशांची आलर्जी आहे. श्रीमंती, सत्ता, संपत्ती या गोष्टींचा त्यांना खुपच तिटकारा आहे. देश स्वतंत्र झाला तेंव्हाच या सर्वांच्या वाडवडिलांनी शपथ घेतली कि आता आपला देश स्वतंत्र झाला आहे आणि आता ते फक्त देशाचाच विचार करणार आहेत. लोकांच्या जमिनी, त्यांचा पैसा ते हडप करणार नाहीत. तर तो आपलाच समजतील.
    आज एका पक्षाचे लोक दुसऱ्याला तुम्ही राज्यासाठी काय केले असे विचारत आहेत.तर दुसरे तुम्ही शैक्षणिक संस्था, कारखाने खाल्ले असे म्हणत आहेत. वास्तविक पहाता दोघेही खरे बोलत आहेत.  हे साधू खोटे कसे बोलणार?
     लोकांचे दुख: पाहून यांच्या अश्रुंचे पाट वहात असतात. कसे ते खाली पहा!